Tuesday 3 September 2024

SIYA TALE सिया टेल- विचारपूस

 



आपण सगळे एकमेकांची विचारपूस करत असतो नाही का? पण घरात फॅमिलीत नाही होत. म्हणजे जिथे फक्त आई बाबा आणि भाऊ बहिण राहत असतील तर आपण रोजच एकमेकांना विचारत नाही,  कसे आहात? काय चालंय वैगरे. आणि nuclear family असल्यामुळं घरात सहसा कोणी येत नाही. हे सगळं सांगायचे तात्पर्य की लहान मुले observe करतात आणि शिकतात. 


पण माझ्या घरात ह्या गोष्टी सहसा होत नाही. Twins असल्यामुळं पाहुण्याची वर्दळ कमीच. तर विचारपूस करणे सीयाने कसे आत्मसात केले कुणास ठाउक?


तिची सई दिदी शाळेतून घरी येते तेव्हा जसे door nock होते तशी सिया आनंदाने नाचू लागते. दिदी आली, दिदी आली! थोडा वेळ दीदी सोफ्यावर बसते आणि थोडी relax झाली की सीयाची विचारपूस चालू होते.


दमी दिदी,

पावसात भिजी दीदी, 

पाऊस खूप होता दिदी. 

हे तिच्या त्या भाषेमध्ये लडिवाळ पणे बोलते. दिदी सियाला मिठी मारते  आणि खूप सारी किसी करते. 

It melts my heart. 💜🥹


Similar way  तिचे बाबा (father) संध्याकाळी येतात तेव्हा तर चित्र वेगळेच असते. जसे door knock होते सिया बोलू लागते अगदी पोपटासारखी.


सिया पप्पा आला.

सिया पप्पा ऑफिस आला.

मम्मी सिया पप्पा आला.

दिदी सिया पप्पा आला.

सगळ्यांना सांगून झाल्यावर सिया नाचत नाचत पप्पाकडे जाते. आणि पुन्हा,

तू भिजा पप्पा?

तू दमा पप्पा?

पप्पा इट्स रेनिंग.

तू भीजा रेन मधे 

And on and on and on.....


गोड, निर्मळ आणि लडिवाळ अशी माझी सिया ! 💜❤️



You may like to read : 

SIYA TALES 

Day in life of Twins 8 months 

My Twins turns one 



----------------------------

This post is a part of Blogchatter Half Marathon’ 


----------------------------------------------

Let's connect ☺️ 

Memory Flies on Social Media 

Instagram 

Facebook 






No comments:

Post a Comment

Featured post

SIYA TALE - STORY TIME

सिया ला पुस्तके खुप आवडतात. माझ्या जुळ्या मुली चार महिन्यांच्या असल्यापासून मी पुस्तकं वाचते. Read aloud. दोघींना खुप आवडतात त्यातली रंगीबेर...