Showing posts with label Marathi Corner. Show all posts
Showing posts with label Marathi Corner. Show all posts

Saturday, 1 November 2025

जावई : अवघड जागेचे दुखणे

 जावई : अवघड जागेचे दुखणे 😆

ही म्हण मला आता समजायला लागली. खरंच ना, जावई हा प्राणी इतका विचित्र का असतो ?

मला तीन मुली आहेत तर स्वाभाविकच मला जावई असणार, hope की ते चांगले असतील ( means good human being) 🤞

बरं, या टॉपिक वर लिहायचा मुद्दा म्हणजे जावई या प्राण्याबद्दल असणारे कोडे. फ्रेंड circle आणि घरच्या siblings ना बघून हा लेख लिहिते. कदचित जावई हा प्राणी या प्रश्नांचे उत्तर देइल. नाहीं मुळात मला, उत्तरे नकोच आहेत पण एक प्रयत्न त्यांची मानसिकता सुधारण्याचा.




बरं, जावई या प्राण्याला इगो असा भयंकर असतो, का बरे? जॉब, फॅमिली, social status ani पैसा ! अरे हे सगळे बघूनच तर आमच्या आई वडिलांनी आमचे लग्न तुमच्यासोबत लावले. ते नसते तर लग्न झालेच नसते. हि गोष्ट तुम्ही लोक का विसरतात?

नवीन लग्न झालेल्या मुलीचा specially जावयाचा पाहुणचार तर खूपच भारी असतो. कारण parent's ना आपल्या मुलीची काळजी असते म्हणून.
यानंतर ही बरेच वेळा काळजीपोटी, आणि तिचा संसार टिकावा यासाठी तिचे आई वडील किती तरी गोष्टी डोळ्याआड करतात. इग्नोर करतात. पण खरंच या गोष्टीचा जावई या प्राण्याला अंदाज तरी असतो का ?

जावई हा प्राणी कसा आहे हे actually baby झाल्यानंतर कळते. तो पर्यंत सगळं छान असते. पण जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा मात्र आई आणि बाबा या दोघांचा खरा स्वभाव कळतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी कसे संस्कार दिले हे ही दिसून येते.

पाहिजे तसे घालून पाडून बोलणे, घर सोडून जा, शिवीगाळ करणे, हात उचलणे, स्वतः बायकोला पोसतो याची जाणीव करून देणे आणि बऱ्याच गोष्ठी समोर येतात. मुळात डोमेस्टिक violence सुरू होतो. अगदी दोघे नवरा बायको वर्किंग असले तरीही.

का ?
काय गरज पडते?
एकदा इगो बाजूला ठेवून नीट बोलून बघावे.
काय गरज पडते मोठ्या माणसानं या सगळया गोष्टीत सहभागी करायची? आणि मुळात divorce हे हत्यार जावई या प्राण्याचे आई वडील का वापरतात?

या सगळया गोष्टी अजूनही समजत नाही. प्रत्येक बायको या सगळया त्रासातून जाते. बायको तुमची, तुमच्या मुलांची आई तरीही इतक्या लेवल पर्यंत नाते का जाते?

खरंच जर जावई प्राणी हे वाचत असेल तर नक्कीच सांगा, का तुम्ही असे वागता?
---------------------------

Disclaimer: Out of 100, there are 70% cases are like this.  This post is for that people. 
-----------------------------

This post is a part of Blogchatter Half Marathon 2025 
-----------------------

Let's connect ☺️ 

Memory Flies on Social Media 

Instagram 

Facebook 

---------------





Wednesday, 29 October 2025

DIWALI FARAL AT EVERY STAGE OF LIFE

दिवालीचा फराळ



आपल्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत या दिवाळीच्या फराळाच्या, नाहीं का?
मला तर आठवते आम्ही सगळे फॅमिली मेंबर एकत्र बसून रात्र भर फराळ बनवायचो. करंजी, शंकरपाळी, लाडू, शेव, चकली, चिवडा, आणि अनारसे हे आमचे ठरलेले फराळाचे पदार्थ. रात्रीचे दोन तीन वाजेपर्यंत सगळे मिळून डबा भर फराळ बनवायचो. आणि तो ही किलोभर!

ही अशी दिवाळी माझे लग्न होईपर्यंत मी enjoy केली. लग्नानंतर नवीन घरात मला तरी बऱ्याच अपेक्षा होत्या. पण सासूबाई फक्त आजूबाजूला वाटण्यासाठीच बनवण्याच्या आणि त्याही माझ्या घरासारख्या टेस्टी नाही. 😶 आपल्या जिभेला एक चव लागली तर तीच रेंगाळत राहते, नाही का?
आणि त्यात इथल्या लोकांना खाणे माहितच नाही. आमच्याघरी तरी फराळ संपेपर्यंत तोच breakfast असायचा. यांच्या घरी अगदी दिवाळीच्या दिवशी सुद्धा चहा चपाती लागते. 😐😑 ते सगळे मला अजीब वाटले पण मी काहीच बोलली नाही. माझ्या मते या घरात मी एकमेव फराळ खाणार खादाड प्राणी होते.

असो, जेव्हा मी माझ्या घरी शिफ्ट झाले तेव्हा मात्र मला एकटीला फराळ बनवायला लागला होता. कारण नवरा म्हणजे अजीब प्राणी, त्याला काहीच बनवता येत नव्हते or else त्याला help नसेल करायची.
पंपांचे फोनवर फोन नुसते, झाली का तयारी? करणार ना फराळ? Bla....bla...bla...
मग काय You Tube matcehi जय, तसा फराळ मी कधीच एकटीने बनवाल नव्हता. नेहमी मी आईला हेल्प करायची त्यामुळे मोजमाप काहीच माहित नव्हते.
आणि पहिल्या वेळी मी करंजी बनवली खूप छान झाली. अगदी माझी मम्मी बनवायची तशीच. बस मग तर काय मी हवेतच उडत होते. You Tube बघून बघून शंकरपाळी, चिवडा आणि बिस्कीट बनवले. आणि माझ्या पप्पांना सुद्धा खूप आवडले.

लास्ट चार वर्षापासून तर मी फराळ बनवला नाही. ट्वीन pregnency आणि नंतर बाळंतपण आणि आता या दोघी काही करून देतील तर ना,
पण सण खूप चांगल्या प्रकारे मी साजरा करते. मुलांना पण सणसूद कळले पाहिजे की नको. तर मला तर खूपच हौस!
मी खूपच नशीबवान ☺️ या वर्षी मला अगदी घरच्यासारखा फराळ मिळाला. गरोदरपनात househelp होती. I am greatful for her🫰
आणि तिनेच या वर्षी सगळा फराळ बनवून दिला. Yummy 😋

एकच खंत ती म्हणजे आम्ही लहानपणी जसे डबे उघडून दिवसभर फराळ खायचो तसे माझी लेकरे खात नाही 😑 त्यांच्यासाठी खास बनवलं आणि दोन दिवसातच त्यांना कंटाळा आला.

तर असा हा फराळाचा प्रवास. कसा वाटला तुम्हाला? तुमचा कसा आहे दिवाळीचा फराळाचा प्रवास? कमेंट box सांगा.



----------------------------
This post is a part of Blogchatter Half Marathon 2025 
-----------------------

Let's connect ☺️ 

Memory Flies on Social Media 

Instagram 

Facebook 

---------------------


Saturday, 12 April 2025

GHIBLI AI

 I guess एक हफ्ता होऊन गेला असेल GHIBLI AI जे बऱ्यापैकी ट्रेडिंग होते. Almost सगळ्याच लोकांनी आपले फोटो Gibhil AI create केलं होते. खूपच छान वाटत होते. नाही का? आणि त्यानंतर तर GHIBHLI gets wrong हा सुद्धा ट्रेंड आला or सध्या चालू आहे. कॉमेडी pictures चा. तोही लोकांनी बऱ्याच प्रमाणात डोक्यावर घेतला. 

तुम्ही सुद्धा केलेच असतील ना असे pictures? Off course सगळ्यांच्या what's App DP वर आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा आहेत. 

पण खरच हे सुरक्षित आहे का? तुम्ही याची खात्री करुन घेतली का?

तर आता तुम्ही बोलल सगळेच तर करत आहेत. काय प्रोब्लेम आहे? तुम्ही AI ला सरळ सरळ पर्सनल pictures चा access देत आहात. 

AI किती डेंजर आहे हे स्वतः Elon ne inform केले आहे. कोणताही अँप इंस्टॉल करताना त्याच्या टर्म्स आणि condition read करणे ही आपली जबाबदारी असते आणि लोक ट्रेंडच्या नादात हे विसरून जातात. तुमचे pic's, तुमच्या family members चे pics, sensitive pics या सगळ्यांच AI कसा वापर करू शकतो याची कल्पना तरी केली आहे का? 

हो, मी नाही ट्रेंडच्या मागे धावत. Specially जिथे असे access मागितले जातात तिथे तर अजिबातच नाही. तसेही काहीही सुरक्षित नाही पण तरीही आपणहून चिखलात का पडायचे? नाही का?

मी GHIBHLI art original creator चा video पाहिला. आणि ही was शॉक. त्याचे creation Ya AI ne काही सेकंदात re-create केले ज्या साठी त्याने खूप मेहनत घेतली होती. बट खरोखर अशा creators चा जॉब गेलाच की नाही? 

सिक्युरिटी लॉज आहेत बट त्यांची अंमलबजावणी होईपर्यंत किती वेळ जाईल याची कोणालाच कल्पना नाही. 

असो.

माझे बोलणे एवढेच आहे की ट्रेंडच्या मागे लागून आपल्या पर्सनल इन्फॉर्मेशन ची access अशी सहजासहजी देऊ नका. 

Be Safe and Secure.

Thursday, 23 January 2025

सिया टेल - तू घाबरु नको

 सिया टेल - तू घाबरु नको 


PS : Google 


आम्ही तिघी means मी, सिया आणि इरा बसून dough सोबत खेळत होतो. मी घरचे पीठ खेळायला देते. खाले तरी काही tension नाही. एक तास आम्ही खूप छान खेळत होतो आणि अचानक फायर ची bell वाजली. मी दरवाजा उघडून बघीतला तर काहीच नव्हते. परत आम्ही आमच्या ॲक्टिव्हिटी मधे busy झालो.


आमच्या कडे गेले दोन महिने काम चालू आहे. सतत आपला आवाज आणि धूळ. कंटाळा आला पण काम काही संपत नाही. आम्ही घरात खेळत होतो आणि फायर ची bell वाजली. माझी सिया मला बोलते,

तू घाबरु नको मम्मी, काम चालू आहे.

I said, okay madam.

परत पुन्हा पुन्हा bell ring होत होती. 

आणि finally माझी सिया बोलते, मी आहे ना mumy, तू घाबरु नको. खाली काम चालू आहे.


मुली कधी mature होतात कळतच नाही. 

तुमच्या सोबत असे काही झाले का? कमेंट बॉक्स मधे

 सांगा. 




Monday, 9 September 2024

SIYA TALE - STORY TIME





सिया ला पुस्तके खुप आवडतात. माझ्या जुळ्या मुली चार महिन्यांच्या असल्यापासून मी पुस्तकं वाचते. Read aloud. दोघींना खुप आवडतात त्यातली रंगीबेरंगी चित्रे, अक्षरे, आणि गोष्टी सुद्धा. 

आपण parents जसे मूलांना मोल्ड करू तसे मुले ग्रो होतात. मला आश्चर्य नाही वाटत जेव्हा माझी सिया मला पुस्तकं वाचून दाखवते. 

तिचे तसे सगळीच पुस्तकं आवडती आहेत. पुस्तकाची हलत बघून कळलेच असेल किती पुस्तकं वाचतो आम्ही. आता ती फक्तं अडीच वर्षाची आहे पण तिला पुस्तकं वाचायला आणि गोष्टी सांगायला खुप आवडते. 


Peppa pig हे आमचे फेवरेट पुस्तकं. 1000 वेळा तरी माझे वाचून झाले असेल. ना, मी कधीच कंटाळत नाही तेच तेच पुस्तकं वाचायला. उलट नवीन प्रकारे तिची स्टोरी सांगायचं प्रयत्न करत असते. आणि त्याचा परिणाम माझ्या मुलींना स्टोरी आणि त्याचा आशय सुद्धा कळतो. तर बघा आता सिया ही पेपा पिग चि स्टोरी कशी वाचते आणि कशी सांगते तिच्या मम्मीला. 


मम्मी डॅडी पेग चे ग्लासेस हरवले. तो पेपर वाचतो. 

जॉर्ज आणि पेपा टीव्ही बघतात.

Sometimes she speak english...  Yaa mummy , Peppa is looking for daddys glasses. 

She goes upstairs.

पेपा वर चालली.

पेपा बाथरूम मधे शोधते.

आणि मग आम्ही फक्तं चित्रे बघतो आणि पाने टर्न करतो. 

शेवटी शेवटच्या पानावर आल्यावर,

Wowo mummy डॅडी पेग ला ग्लासेस मिळाले.

मी विचारते कुठे होते त्याचे 🤓 ग्लासेस?

सोफ्यावर होते मम्मा,

डॅडी पेग त्यावर बसला होता.

आणि मग ती मला हायफाय देते. 

मग मी पुन्हा विचारते कसे मिळाले ग्लासेस?

पेपा ने शोधले सगळीकडे.

मी विचारते कुठे कुठे शोधले?

पेपा बेडरुम मधे जाते,

पिलो खाली बघते,

But glasses was noth there.

मग ती bathtub मधे बघते,

But glasses was not there,

मग डॅडी पेग सोफ्यावरून उठतो 

आणि ग्लासेस तिथे असतात.

आणि मग सिया लास्ट page turn करते आणि बोलते 

THE END


आणि आमची स्टोरी संपते. 


तुम्ही वाचता का तुमच्या बेबी सोबत स्टोरी? तुमच्या बेबीना स्टोरी आवडतात का?


------------------

This post is a part of the Blogchatter Half Marathon 


----------------------------------------------

Let's connect ☺️ 

Memory Flies on Social Media 

Instagram 

Facebook 

---------------------------





Saturday, 7 September 2024

SIYA TALE - A PHONE CALL

Hello, and welcome. Today post I am sharing Siya's phone call 😊 (My Little dolls talk)


SIYA TALE - A PHONE CALL



हॅलो, हा,....

असा सियाचा कॉल सुरू होतो. सिया फक्त अडीच वर्षाची आहे पण चटरबॉक्स आहे ती.


मम्मीचा फोन आला की नुसती तिची बडबड चालू होते. मी या खोलीतून त्या खोलीत जात असते पण माझी लेक माझ्यामागे सतत फिरत असते. फोन वर कोणीही असो तिला फक्त बोलायचे असते. ती कोणाला ओळखत नाही पण तरीही तीला हॅलो करुन फोनवर गप्पा मारायच्या असतात. 


शेवटी मला काही बोलता येत नाही तर मी फोन देते तिच्या हातात. अगदी कानाला फोन लावून मोठ्या लोकांसारखा तिचा फोन कॉल चालू होतो. बरं अडीच वर्षाची ही छोटी काय बोलत असेल?


हॅलो,

मी बोलते,

सिया बोलते,

पप्पा ऑफिस गेला ( गेला हा शब्द elongated स्वरात असतो) 

इरा टॉईज खेळते.

दिदी नुसता टीव्ही बघते. 

हे खेळते, बघते स्वर elongated असतात.

बरं पलीकडून कोणी काय विचारले तर ही आपली काय, काय करत असते. 

आणि मग पुन्हा तिचे सुरू होते,

सिया फोनवर बोलते.

पप्पा ऑफिस गेला.

मम्मी जेवण बनवते.

सिया फोनवर बोलते.

दिदी मोबाईल बघते.


आणि जर चुकून तिचा पप्पा घरी असेल तर 

पप्पा नुसता मोबाईल बघतो.

पप्पा snoring करतो.

पप्पा झोपतो.

आणि bla..bla...bla...



तर असे आमचे phonecall होतात. मला तर कोणाशी काही बोलता येत नाही आणि ही बया सगळे सांगत बसते. 

तुमचेही छोटी डॉल असेच करते का? 

कमेंट बॉक्स मधे सांगा.


------------------

This post is a part of the Blogchatter Half Marathon 


----------------------------------------------

Let's connect ☺️ 

Memory Flies on Social Media 

Instagram 

Facebook 

------------------------

Featured post

ADOPTION

Adoption means बाळ किंवा छोटे मूल दत्तक घेणे. या गोष्टीला सहसा कोणी तयार होत नाही. म्हणजे बरेच लोक घेतात दत्तक पण सामान्यपणे मराठी लोक तया...