दोन दिवस झाले आमचा टिव्ही बंद होता. कारणं रिमोट बंद होता आणि म्हणून आम्ही नो स्क्रीन डे साजरा केला अगदी आनंदाने 😄
तसाही माझ्या घरी स्क्रीन लिमिटेड वेळेसाठी असतो. जर माझ्या ट्वीन खूपच त्रास देत असतील आणि किचन मधे जर जेवण बनवायचे असेल तरच काय तो अर्धा पाऊण तास टीव्ही चालु असतो. त्यातही दोघी सुरुवातीची दहा - पंधरा मिनिटे मन लावून बघतात आणि नंतर खेळणी सोबत खेळतात. पण टिव्ही चालु असतो. (Background) Not a whole day
(तुमच्या माहितीसाठी माझ्या twins २४ महिन्याच्या आहेत आणि मोठी १० वर्षाची मुलगी. )
या दोन दिवसात खूप छान अनुभव आला. त्यांनी एकदाही टिव्ही लावं असे सांगितलं नाही. Infact त्या दोघीही खेळणी सोबत समरसून गेल्या होत्या. वेळेत breakfast, lunch and dinner हि केले आणि खेळा मुळे त्यांना झोपही चांगली लागली specially दुपारची झोप. उठल्यानंतर आम्ही खाली ग्राउंड वर पण गेलो. सहसा मला एकटीला त्यांना नेता येतं नाही पण त्यादिवशी पप्पा घरी होते म्हणूनच आम्ही गेलो. तिथेही त्या खूप दमल्या. धावून धावून दोघींनी पप्पांची सुद्धा exercise केली.
तर दिवसभर आम्ही नक्की काय केले. ना, मी किंवा दिदी सारखे त्यांना entertain नाही करत. खेळ खेळताना सोबत बसतो आणि थोड्या वेळाने हळूहळू त्यातून बाहेर पडतो. दिदी त्यांच्या जवळच असते कारण सतत तोंडात काहीही टाकण्याची सवय अजून आहे. But mumma येत जात असते.
माझ्याकडे लिमिटेड खेळणी आहेत. त्यातला त्यांना आवडणारे blocks. टॉवर बनवणे हा त्यांचा आवडता खेळ. उंच असा टॉवर बनवतात दोघीही माझ्या मदतीशिवाय. I am proud of it.
व्हेजिटेबल आणि फ्रूट हे सुध्दा आवडतात. सगळ्यात जास्त सियाला pretend Play आवडतो. तिचा छोटा बाबू डॉल आहे. त्याला जेवण भरवणे, त्याला अंघोळ घालणे, त्याला झोपवणे हे तिचे फेवरेट टास्क. ती स्वतः खुप एन्जॉय करते. त्याला झोपवताना आम्हाला शू शू करून शांत बसवते आणि बोलते baby is sleeping, shuuu! ...it melts my heart.
इरा स्वतःच्या दुनियेत जास्त मग्न असते पण सहसा ती ही सियासोबत खूप छान खेळते. डान्स हि दोघी मिळून खुप छान करतात. तर पूर्ण दिवस आम्ही कलरिंग, ब्लॉक्स, आणी खूप सारी पुस्तके वाचली. पकडा पकडी आणि लपाचुपी खेळलो. खूपच मज्जा केली घरातच. आणि म्हणूनच एक किंवा दोन दिवस तरी नो स्क्रीन डे साजरा करायचा असे ठरवले. ईथे स्क्रीन म्हणजे फक्तं मोठा स्क्रीन टिव्ही हाच आहे. मोबाईल अजून मी देत नाही त्यांच्या हातात.
तुम्ही सुद्धा महिन्यातून एकदा असा नो स्क्रीन डे कराच आणि मुलांसोबत कनेक्ट राहा.
CR : MemoryFlies
--------------------------------------
Follow Memory Flies on Social Media