Monday, 2 September 2024

SIYA TALES - सिया टेल

SIYA TALES



सई माझी मोठी मुलगी 11 वर्षाची. माझ्या जुळ्या मुली झाल्यापासून मला आठवत नाही ती माझ्या मांडीवर कधी झोपली. कारण  मांडीवर या दोघींचा कब्जा असतो. बिचारी सई कधी कधी रडते तर कधी कधी दोघींना जबरदस्ती बाजूला करते तर कधी कधी खूप चिडचिड करते. माझ्या मते असे तुम्हा सगळया आयांसोबत झाले असणार ना?

आणि मग रडत बोलत असते , मम्मी तू मला जवळच घेत नाही. माझे लाड करत नाही.

मी कितीही समजावले तरी ती मान्य करत नाही. मग शेवटी मला माझ्या अडीच वर्षाच्या लहान मुलीसोबत बोलावे लागते. ती बरीच शहाणी आहे बरं का 😁


 मी : मी जशी तुझी मम्मी आहे तशीच दीदी ची सुद्धा मम्मी आहे.

सिया : नो. तू दिदीची मम्मी नाही. 

मी : ना बेटा मी तिची पण मम्मी आहे. ती पण माझ्या मांडीवर झोपू शकते. तू तिला का झोपून देत नाही.

सिया : नाही . तू फक्त सियाची मम्मी आहे.

मी : उठ, झोपू दे तिला पण थोडा वेळ.

सिया : मम्मी व्हील्स ओन द बस गो राऊंड अँड राऊंड. 

इट्सी बिस्ती स्पायडर... आणि तिने poem गायला सुरुवात केली.

मी तिच्याकडे बघत राहिले. 😊


आणि आपण बोलतो की लहान मूलांना काहीच समजत नाही. विषय कसा change करायचा हे ती बरोबर शिकली. की असे बोलू ते तिला बरोबर जमले. 😊 असो मी आणि माझी सई आम्ही दोघी हसत राहीलो. 

आणि मग सिया ने मला मिठी मारली. 

अशी माझी सिया 💕


Sharing small tidbits of my small doll - Siya who surprised me with her intellectual. I wanted to preserve this lovely memories. Hope you will love this. 


----------------

This post is a part of Blogchatter Half Marathon’ 


-----------------------------------

Let's connect ☺️ 

Memory Flies on Social Media 

Instagram 

Facebook 

----------------------------------------------------





No comments:

Post a Comment

Featured post

BOOK REVIEW: AMONGST THE BELIEVERS

Title : AMONGST THE BELIEVERS Genre : Contemporary Fiction, Thriller Page Count : 290 Author : Kochery C. Shibu Publisher : Mishan Design Po...