Monday, 6 May 2024

बीच पिकनिक 🧺

बीच  पिकनिक 🧺 : ३० मार्च २०२४





बीच, समुद्रकिनारा आणि सूर्यास्त ह्या दोन गोष्टी माझ्या जवळच्या. लग्नानंतर बरेच फिरलो आम्ही, जसे कन्याकुमारी, केरळ, अंदमान आणि निकोबार, अगदी गोवा सुद्धा. इथले beach खूप स्वच्छ आणि पाणी नीळभोर असते. ती स्वच्छता आपल्या मुंबईत नाही. आणि कदचित त्याचमुळे मुंबईचे beach कधी फिरलोच नाही. म्हणजे लहानपणी फिरलो जुहू बीच, आपले शिवाजी पार्क पण घान अजूनही नाही किंबहुना वाढलीच आहे.

असो हा वेगळा विषय...

बीच पिकनिक by MemoryFlies


सूर्यास्त खूप सुंदर असतो. आधी पिवळा आणि मग हळूहळू नारंगी , लालसर अशा रंगाची धुळवड होते आणि मध्यभागी जी चमक असते ती तर खूपच अप्रतिम असते. ते दृश्य शब्दात मांडता येने कठीण. 

बरेच वर्षाने माझ्या दोन चिमुकल्या सोबत आणि माझ्या मोठया समजदार मुलीसोबत गेलो. मुंबईला राहतो म्हणूनच की काय हे पॉसिबल झाले. समर वेकेशन - उन्हाळी सुट्टी आणि मग काय मुलांना बोर होणे साहजिक आहे. 

ह्या वेळेस मज्जा आली. म्हणजे लहान मुलांसोबत अनुभवलेला किनारा. 

त्या ओल्या वाळूत चीमुकल पाय उमटत होते. दोन लहान हात कोरड्या वाळूत खेळत होते. माझी twins toddler खूप वेगळ्या आहेत. एकीला तर मैत्री कशी करायची हे बरोबर कळते. आम्ही toys गाडीत विसरलो आणि मग दुसऱ्याचं खेळणी बघून रडारड सुरू झाली. पण थोडा वेळेचं. तिने जाऊन दादा ला hi करून टॉईज शेअर सुद्धा केली. अणि मनसोक्त मातीत खेळली. अशी माझी चिमुकली. 

मग दीदी सुद्धा खेळत होती. दिदीला फारसे पटले नव्हते दुसऱ्याच्या toys सोबत खेळणे पण काय करणार ती सुद्धा एन्जॉय करत होती.

बीच पिकनिक by MemoryFlies


आता सगळ्यात लहान तर खूपच डेंजर. आम्ही बेडशीट अंथरूण, चप्पल कादून शांतपणे बसलो होतो. मग हिला भूक लागली आणि तिने तर वाळू खायला सुरुवात केली.😄 त्यानंतर तीला फक्त बॉल दिसला आणि तो मिळेपर्यंत त्याच्या मागे त्या वाळूत ती धावत होती. सगळीच मुले खेळणी शेअर करतात असे नाही पण हिला कोण समजवनार. ती बॉलच्या मागे तर मी तिच्या मागे. बऱ्याच वेळ आमची मायलेकची रंनिंग चालू होती. नंतर पप्पाला दया आली आणि तो तिच्या मागे किंवा तिच्या सोबत धावू लागला. बऱ्यापैकी फोटो अंड व्हिडिओ घेतले त्याने. स्मार्ट पप्पा !

First time सई (मोठी मुलगी) beach वर आली होती. सगळीकडे पाणी च पाणी बघून खुप खुश होती. त्या बीचवर बऱ्याच activities होत्या. त्या बघून तिला भीती पण वाटली आणि बरेच प्रश्न पण विचारले. मी insist केले जाते का राईड वर तर नाही बोलली. पण तिने सगळ्या activity पाहिल्या आणि त्या किती सुरक्षित आहे ह्याचे observation केले. तसेही ती थोडी घाबरट आहे. आणि एका दृष्टीने ते आमच्यासाठी चांगलेच आहे. हो ना, parents? 

बीच पिकनिक by MemoryFlies


शेवटी आम्ही पाण्यात गेलो. आधी तिघी बहिणी घाबरत होत्या पण आमच्यासोबत त्यांनीही एन्जॉय केला. कारण आजूबाजूला बरेच लहान मुले, मोठी माणसे, आणि मोठ्या मुलीसुद्धा समुद्रात पोहत होत्या. ते पाहत पाहत आम्ही थोड्याफार अंतरावर गेलो. अगदी गुडघ्याच्या खाली एवढ्या पाण्यात होतो. मोठ्या मुलीने शूज घातले होते आणि सगळी वाळू त्यात गेलीं त्यामुळे चांगली वैतागली होती. पण नंतर शांत झाली कारण आमच्या ही शूज मधे वाळू गेली होतीच ना. 

कधी नव्हे ते फोटोग्राफर कडून फॅमिली पिक काढला. अंधार झाला होता पण तरीही पिक छान आला.

बीच पिकनिक by MemoryFlies


तर अशी ही आमची समर वॅकेशन ची बीच पिकनिक. आवडली का तुम्हाला? 

--------------------------------------

मी प्रथमच मराठीतून लिहायचं प्रयत्न केला. आवडला असेल तर कमेंट करा. 

---------------------------------

माझ्याशी कनेक्ट होण्यासाठी 

Instagram 

Facebook 


----------------------------------------

©Neeta Kadam. This article and image are the property of Memory Flies. Any unauthorised use or duplication of this material without express and written permission from this site’s author is strictly prohibited.

--------------------------------------



No comments:

Post a Comment

Featured post

1 January 2025

Welcome 2025 !  As you grow old you realise life is difficult. Every day new challenge and we survived it. Right! We survived because life i...