Monday, 14 August 2023

अरे यार 10 वर्षाची झाली मी !



अरे यार 10 वर्षाची झाली मी …

अंग झालीस पण 10 वर्षाची बापरे!  तुला बघता कधी मोठी झालीस समजलेच नाही ग ! मोठी झालीस हे बोलण्यामागे खूप जबाबदारी आणि एक वेगळीच गम्मत आहे बरं का ...!

जेव्हा मला तुझ्या मम्मी ने सांगितले कि सई ला पेरिएडस (पाळी ) आलीय तेव्हा काय सांगू तुला जणू ह्या जगातला सगळ्यात जास्त खुश मी असेन कारण तुझ्या जन्मापासून फक्त मी आणि तुझी मम्मीच होते ना सोबत .. त्यामुळे एवढीशी तू ..आणि आज तू एवढी मोठी झालीस ..हा प्रवास आठवूनच डोळ्यात पाणी आले अर्थात आनंदाचे ..! तुला माहितीच आहे कि त्या दिवशी घरी येऊन मी काय केले .. ते फक्त माझ्या लाडक्या गुड्डू साठी ...!

पण तू ते  खूप लवकर आत्मसात केलेस ..रडली नाहीस उलट मी तुला मिठी मारून रडत होतो तेव्हा तू मला शांत केलेस .शेवटी पप्पा  आहे ना ग तुझा मी अश्या प्रसंगी रडायला येणारच ना ...!

दुसरे सांगायचं म्हणजे तू नशीबवान म्हणजे तुला जुळ्या बहिणी मिळाल्या .. आता तुमची मोठी गट्टी होणार ना..! पण एक लक्षात ठेव गुड्डू तू तुझ्या बहिणीची दुसरी मम्मी आहेस कारण तुला जेवढे छान शिकवता येईल तेवढे शिकव , मस्त बॉण्डिंग ठेवा तिघी .. मज्जा करा .. बाकी पप्पा मम्मी आहेतच ना सोबत .

आता तू मुंबई मध्ये परत आली आहेस , तुला नवीन मित्र मैत्रिणी भेटणार तुझे खरे नवीन आयुष्य सुरु होणार . शाळेत नवीन अभ्यास , नवीन शिक्षक सगळे कसे नवनवीन .. मज्जा आहे बुवा तुझी .. 

पण आता तुझी खरी परीक्षा आहे कारण सगळे लाइफ changing आहे .. खूप अभ्यास कर , छान माणूस म्हणून तयार हो आणि ते तू होशीलाच ...!

गुड्डू तुला तुझ्या 10 व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा .. खूप मोठी हो , खूप यश मिळो तुला .. आणि शेवटी अरे यार .. बोलायला विसरू नकोस ....


तुझा पप्पा ....




©Neeta Kadam. This article and image are the property of Memory Flies. Any unauthorized use or duplication of this material without express and written permission from this site’s author is strictly prohibited.



No comments:

Post a Comment

Featured post

ADOLESCENCE

Everyone is talking about this short series on Netflix. I can't resist myself and after watching it - it hits hard as a parent. The youn...