ऐकले होते *बाप आणि मुलीचे जे नाते* असते, ते काहीतरी वेगळेच असते. पण जेव्हा स्वतः अनुभव घेतोय तेव्हा जाम भारी वाटतेय.मला नव्हते वाटले मी तुझ्यासाठी हे असे काहीतरी *सो कॉल्ड* पोस्ट वैगैरे लिहीन कारण आत्तापर्यंत तुझे माझे नाते नेहमी गुलदस्त्यात असायचे, पण का कुणास ठाऊक वाटले मला कि काहीतरी लिहू आपल्याबद्दल म्हणून लिहितोय .
प्रथम तुला *वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा* खूप मोठी हो , हुशार हो , खूप शिक आणि जे काही शिकशील ते आचरणात असुदे आणि त्याच गर्व करू नकोस. तू सध्या वयाने लहान आहेस पुढे जाऊन वाचशील तेव्हा कळेल तुला मी काय बोललो आहे .
तुझ्या माझ्याबद्दल बोलायचे तर ,कदाचित तुला ठाऊक नसेल त्या दोन गायकांबद्दल म्हणून सांगतो तुला संदीप आणि सलील कुलकर्णी यांचे *दमलेल्या बाबांची कहाणी* ह्या गाण्यातली एक ओळ आहे ती म्हणजे *"आई म्हणण्या आधी सुध्दा म्हंणली होतीस बाबा"* हे जसाच्या तसे आपल्या बाबतीत घडले. तुला आधी पण बरेचदा सांगितले होते मी कि फक्त १० महिन्यांची होतीस तेव्हा पाहिल्यान्दा तू पप्पा असे बरोबर ९ वेळा बोलली होतीस. मला वाटले काय आहे, काय बोलतेस, मग लक्ष देऊन ऐकले तेव्हा समाजले पप्पा-पप्पा बोलतेस. अजूनही ते आठवले कि डोळ्यात पाणी येतं आणि त्या गाण्याच्या ओळी आठवतात. कदाचित त्या क्षणानंतर का असे ना पण तुझे माझे नाते अधिकच घट्ट होत गेले. खरे तर प्रत्येक बापसाठी मुलगी काय असते हे सांगायला नको.
त्या नंतर तुझी इवलीशी पावले टाकत-टाकत चालत राहिलीस. त्या पावलांची विडिओ क्लिप तुला दाखवली होती मी. आठवत असेल बघ तुला. आत्ताच बघ ना हे लिहितोय मी सकाळी उठून तर तू तिकडे पण उठून आलीस आणि विचारतेस काय लिहितोयस करून.
सध्या तर ह्या लॉक डाउनच्या काळात सतत तुझ्या सोबत असतो तर तुला जरा पण मी कुठे गेलो कि १० वेळा घरात विचारात बसतेस "पप्पा कधी येणार घरी??? पप्पा कधी येणार घरी???" अग बाळा..पप्पा कुठेही गेला तरी तू असतेस कि सोबत. तुला तुझा पप्पा सकाळपासून रात्री झोपेपर्यंत समोरच लागतो .
तुला वाटत असेल ना पप्पा कधीकधी खूप दम देतो. पण तसं नाहीये... दम देतो त्यापेक्षा १००० पटीने प्रेम पण करतो. आता भीती याची आहे कि माझे ऑफिस चालू झाल्यावर आपले कसे होणार… ना मला करमणार...ना तुला. पण खूप मज्जा येते तुझे सगळं करायला, अगदी शी शु पासून सगळे तुझे माझ्या कडेच असते आणि मी खूप एन्जॉय करतो ते .
हल्लीच एक सांगायचे तर तुझे केस कापायचे होते तेव्हा खूप रडलीस. पण नंतर मी समजावले. तेव्हा पण रडतच होतीस... पण जेव्हा तुला तुझे आवडते बार्बीचा एक सेट घ्यायचे प्रॉमिस केले तेव्हा मात्र लगेच तयार झालीस केस कापायला...शहाणी कुठची....! असो तो पण तुझ्या लहानपणीचं एक भाग आहे .आता मोठी होतेयेस. आता अजून खूप गोष्टी कळायला लागतील तुला .. पण काही नाही समजले तर नक्की पप्पाला विचार न घाबरता आणि तसे हि तू विचारशील हे मला पक्के ठाऊक आहे .
आज आठवे वर्ष लागलेय तुला .... अशीच अनेक वर्ष येतील तू मोठी होत राहशील ...पण आई-पप्पानीं सांगितलेल्या गोष्टी मात्र कायम लक्षात ठेव आणि मला विश्वास आहे तू ठेवशील ....
तुला (माझ्या *सईस* उर्फ *सयोस*) पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!
Disclaimer: This is a special article written by his dad for her birthday. I hope you all like it.
No comments:
Post a Comment