दिवालीचा फराळ
आपल्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत या दिवाळीच्या फराळाच्या, नाहीं का?
मला तर आठवते आम्ही सगळे फॅमिली मेंबर एकत्र बसून रात्र भर फराळ बनवायचो. करंजी, शंकरपाळी, लाडू, शेव, चकली, चिवडा, आणि अनारसे हे आमचे ठरलेले फराळाचे पदार्थ. रात्रीचे दोन तीन वाजेपर्यंत सगळे मिळून डबा भर फराळ बनवायचो. आणि तो ही किलोभर!
ही अशी दिवाळी माझे लग्न होईपर्यंत मी enjoy केली. लग्नानंतर नवीन घरात मला तरी बऱ्याच अपेक्षा होत्या. पण सासूबाई फक्त आजूबाजूला वाटण्यासाठीच बनवण्याच्या आणि त्याही माझ्या घरासारख्या टेस्टी नाही. 😶 आपल्या जिभेला एक चव लागली तर तीच रेंगाळत राहते, नाही का?
आणि त्यात इथल्या लोकांना खाणे माहितच नाही. आमच्याघरी तरी फराळ संपेपर्यंत तोच breakfast असायचा. यांच्या घरी अगदी दिवाळीच्या दिवशी सुद्धा चहा चपाती लागते. 😐😑 ते सगळे मला अजीब वाटले पण मी काहीच बोलली नाही. माझ्या मते या घरात मी एकमेव फराळ खाणार खादाड प्राणी होते.
असो, जेव्हा मी माझ्या घरी शिफ्ट झाले तेव्हा मात्र मला एकटीला फराळ बनवायला लागला होता. कारण नवरा म्हणजे अजीब प्राणी, त्याला काहीच बनवता येत नव्हते or else त्याला help नसेल करायची.
पंपांचे फोनवर फोन नुसते, झाली का तयारी? करणार ना फराळ? Bla....bla...bla...
मग काय You Tube matcehi जय, तसा फराळ मी कधीच एकटीने बनवाल नव्हता. नेहमी मी आईला हेल्प करायची त्यामुळे मोजमाप काहीच माहित नव्हते.
आणि पहिल्या वेळी मी करंजी बनवली खूप छान झाली. अगदी माझी मम्मी बनवायची तशीच. बस मग तर काय मी हवेतच उडत होते. You Tube बघून बघून शंकरपाळी, चिवडा आणि बिस्कीट बनवले. आणि माझ्या पप्पांना सुद्धा खूप आवडले.
लास्ट चार वर्षापासून तर मी फराळ बनवला नाही. ट्वीन pregnency आणि नंतर बाळंतपण आणि आता या दोघी काही करून देतील तर ना,
पण सण खूप चांगल्या प्रकारे मी साजरा करते. मुलांना पण सणसूद कळले पाहिजे की नको. तर मला तर खूपच हौस!
मी खूपच नशीबवान ☺️ या वर्षी मला अगदी घरच्यासारखा फराळ मिळाला. गरोदरपनात househelp होती. I am greatful for her🫰
आणि तिनेच या वर्षी सगळा फराळ बनवून दिला. Yummy 😋
एकच खंत ती म्हणजे आम्ही लहानपणी जसे डबे उघडून दिवसभर फराळ खायचो तसे माझी लेकरे खात नाही 😑 त्यांच्यासाठी खास बनवलं आणि दोन दिवसातच त्यांना कंटाळा आला.
तर असा हा फराळाचा प्रवास. कसा वाटला तुम्हाला? तुमचा कसा आहे दिवाळीचा फराळाचा प्रवास? कमेंट box सांगा.
----------------------------
-----------------------

No comments:
Post a Comment