Saturday, 1 November 2025

जावई : अवघड जागेचे दुखणे

 जावई : अवघड जागेचे दुखणे 😆

ही म्हण मला आता समजायला लागली. खरंच ना, जावई हा प्राणी इतका विचित्र का असतो ?

मला तीन मुली आहेत तर स्वाभाविकच मला जावई असणार, hope की ते चांगले असतील ( means good human being) 🤞

बरं, या टॉपिक वर लिहायचा मुद्दा म्हणजे जावई या प्राण्याबद्दल असणारे कोडे. फ्रेंड circle आणि घरच्या siblings ना बघून हा लेख लिहिते. कदचित जावई हा प्राणी या प्रश्नांचे उत्तर देइल. नाहीं मुळात मला, उत्तरे नकोच आहेत पण एक प्रयत्न त्यांची मानसिकता सुधारण्याचा.




बरं, जावई या प्राण्याला इगो असा भयंकर असतो, का बरे? जॉब, फॅमिली, social status ani पैसा ! अरे हे सगळे बघूनच तर आमच्या आई वडिलांनी आमचे लग्न तुमच्यासोबत लावले. ते नसते तर लग्न झालेच नसते. हि गोष्ट तुम्ही लोक का विसरतात?

नवीन लग्न झालेल्या मुलीचा specially जावयाचा पाहुणचार तर खूपच भारी असतो. कारण parent's ना आपल्या मुलीची काळजी असते म्हणून.
यानंतर ही बरेच वेळा काळजीपोटी, आणि तिचा संसार टिकावा यासाठी तिचे आई वडील किती तरी गोष्टी डोळ्याआड करतात. इग्नोर करतात. पण खरंच या गोष्टीचा जावई या प्राण्याला अंदाज तरी असतो का ?

जावई हा प्राणी कसा आहे हे actually baby झाल्यानंतर कळते. तो पर्यंत सगळं छान असते. पण जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा मात्र आई आणि बाबा या दोघांचा खरा स्वभाव कळतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी कसे संस्कार दिले हे ही दिसून येते.

पाहिजे तसे घालून पाडून बोलणे, घर सोडून जा, शिवीगाळ करणे, हात उचलणे, स्वतः बायकोला पोसतो याची जाणीव करून देणे आणि बऱ्याच गोष्ठी समोर येतात. मुळात डोमेस्टिक violence सुरू होतो. अगदी दोघे नवरा बायको वर्किंग असले तरीही.

का ?
काय गरज पडते?
एकदा इगो बाजूला ठेवून नीट बोलून बघावे.
काय गरज पडते मोठ्या माणसानं या सगळया गोष्टीत सहभागी करायची? आणि मुळात divorce हे हत्यार जावई या प्राण्याचे आई वडील का वापरतात?

या सगळया गोष्टी अजूनही समजत नाही. प्रत्येक बायको या सगळया त्रासातून जाते. बायको तुमची, तुमच्या मुलांची आई तरीही इतक्या लेवल पर्यंत नाते का जाते?

खरंच जर जावई प्राणी हे वाचत असेल तर नक्कीच सांगा, का तुम्ही असे वागता?
---------------------------

Disclaimer: Out of 100, there are 70% cases are like this.  This post is for that people. 
-----------------------------

This post is a part of Blogchatter Half Marathon 2025 
-----------------------

Let's connect ☺️ 

Memory Flies on Social Media 

Instagram 

Facebook 

---------------





Featured post

जावई : अवघड जागेचे दुखणे

 जावई : अवघड जागेचे दुखणे 😆 ही म्हण मला आता समजायला लागली. खरंच ना, जावई हा प्राणी इतका विचित्र का असतो ? मला तीन मुली आहेत तर स्वाभाविकच ...