Adoption means बाळ किंवा छोटे मूल दत्तक घेणे. या गोष्टीला सहसा कोणी तयार होत नाही. म्हणजे बरेच लोक घेतात दत्तक पण सामान्यपणे मराठी लोक तयार होत नाही दत्तक घेण्यासाठी.
माझ्या नातेवाईकांमध्ये आणि बऱ्याच फ्रेंड्सरेकल मधे सुध्दा मूल नसण्याचे प्रमाण जास्त आहे. पण तरीही ही लोक अनाथाश्रमातून मूल दत्तक घेण्यास तयार नसतात. कारण बरेच वेळा emotional असते आणि प्रॅक्टिकल नाहीत. मला खरच कळत नाही की का लोक दत्तक घ्यायला तयार नसतात? ते जर रक्ताचे कारण असेल तर मात्र ते विचित्र वाटते. आपल्या सगळ्यांचे रक्त लाल रंगाचे असते. आणि कोणत्याही तर्क मांडण्याआधी त्या बाळाचा काय दोष? हा सुद्धा विचार करायला हवा ना?
मी काही उदाहरण सांगते.
माझ्या पापांचे एक मित्र होते. त्यांना 13 वर्ष मूल नव्हते. नंतर एक बाळ झाले पण तेही जेमतेम 5 वर्ष जगले. पण या दाम्पत्यानि बाळ दत्तक घेतले नाही. घरची श्रीमंती सुध्दा होती. माझा मुद्दा एवढाच की एखाद्या बाळाचं आयुष्य छान असते.
माझी एक फ्रेंड सुध्दा आहे. तिच्या लग्नाला तर 20 वर्ष झाली पण एकदाही तिला मूल दत्तक घेण्याची इच्छा झाली नाही. मी बरेच वेळा suggestions दिले पण तिची कारणे हीच कोणाचे रक्तं असेल?
माणसाची नियत चांगली हवी आणि पुण्य करायला पण हिम्मत लागते. मला 3 मुली आहेत. जर फक्त एक मूल असते तर मी नक्कीच दत्तक घेणार होते.
Kristin हे एक इंस्टाग्राम चे account आहे. हि स्त्री मूळची अमेरिकन पण तिला स्वतःच्या 3 मुली असून पण तिने एका अपंग मुलीला दत्तक घेतले. ऑपरेशन करून तिला नवीन पाय बसवले आणि तिला एक Happy Life दिली. खरच खूप छान वाटतं ते बघून.
तुमचं काय मत आहे? जर घरची financial condition चांगली असेल तर दत्तक जरूर घ्यावे. ह्या मुलांना सुद्धा education and good Life जगण्याचा हक्क आहे.
Disclaimer: Each parent is unique and have different way of thinking. This is my opinion.
But for the sake of Kids future if we parent do such good deeds it will definitely change someone's life.
-------------------
This post is a part of Blogchatter Half Marathon 2025
-----------------------

No comments:
Post a Comment